Breaking News

ठराविक लोकांमुळे ‘अॅट्रॉसिटी’ अडचणीत माजी पोलीस अधिकारी रोकडे यांचे मत


शिर्डी/प्रतिनिधी  - ‘अॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करण्याची गरज नाही. काही ठरविक लोकांनी या कायद्याच्या गैरवापर केला. म्हणून हा कायदा रद्द अडचणीत आला. मात्र हा कायदाच रद्द करण्याची गरज नसून त्यात सुधारणा आवश्यक आहे, असे मत माजी पोलीस उपाधिक्षक के. पी. रोकडे यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, दलितांवर अन्याय झाल्यावर सुरुवातीला तक्रार नोंदून घेतली जात नाही. तपास यंत्रणेवर दबाव असतो. दाखल केल्यानंतर काही कालावधी नंतर दोन्ही गटात तडजोडी होतात त्यामुळे अशा खटल्यात निर्दोषत्वाचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी समाजात व सर्वच लोकात प्रबोधनाची गरज आहे. सर्वच घटकात कायदे पालनाची भावना असणे आवश्यक आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी पाठपुरावा झाला पाहिजे. अनेकवेळा ग्रामीण भागात यासाठी एखाद्याचा वापर करून गुन्हा दाखल केला जातो. कधी कधी खरोखर अन्यायसुद्धा झालेला असतो. मात्र त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून कारवाई केली जात असते.