गेवराई-बाशी येथे ग्रामस्वच्छता अभियानास प्रारंभ
या अभियानाचे उदघाटन तहसीलदार महेश सांवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छतादूत डॉ. धोंडिराम पुजारी, सरपंच सखाराम वाघ, भगवान मुळे, संजय कोरडे, राम वाघ, दाद वाघ, जाधव, सज्जन तांबे, रविंद्र खुटेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता चळवळीत आता ग्रामीण भागातील तरूणांनी सहभागी होऊन आपल्या गावात जनजागृती करावी, असे आवाहन करून पुजारी म्हणाले, बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम तरुणांनी करावे.