Breaking News

जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा


राहता शहरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला . विरभद्र देवस्थान ट्रस्ट व हनुमान चालिसा सेवा मंडळाच्या वतीने ११ नागरिकांना हनुमान श्री पुरस्कार देण्यात आले. 

हनुमान चालिसा सेवा मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या वेळीहिंदू राष्ट्र युवक मंडळाच्या भद्रा मारुती ते राहता पायी ज्योतीचे स्वागत करण्यात आले . सकाळी भजन ,व जन्मोत्सव व शोभायात्रा आदी कार्यक्रम झाले . 

या नंतर सामाजिक ,सांस्कृतिक ,व इतर क्षेत्रात आदर्श कार्य करणाऱ्या ११ नागरिकांना हनुमान श्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .या मध्ये अनंत शास्त्री लावर ,शिवाजी अनाप ,सुंदरलाल छल्लारे ,निर्मला अनंत पीडिआर ,गणेश ऑटो ,कारभारी मेहेत्रे , नाना वीर ,दिगंबर सातव ,सुनील देव्हारे ,सतीश निकम, आदींना या वेळी हनुमान श्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले