Breaking News

चांदा परिसरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात


नेवासा तालुक्यातील चांदा व परिसरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त भजन, किर्तनरुपी सेवेचा भाविकांनी आनंद घेतला. या निमित्ताने चांदा व परिसरात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन चांदा ग्रामस्थांनी केले होते . यावेळी दररोज भजन तसेच नामांकित किर्तनकारांची रोज रात्री किर्तंनांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील मुख्य हनुमान मंदिर असल्याने अनेक भाविकांनी या ठिकाणच्या भजन ,कीर्तनाचा आनंद घेतला. या प्रसंगी भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. 

तसेच चांदामिरी रोड लगत माद्गुल वस्ती शेजारील हुनुमान मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिरात पहाटे काकडा भजन, हरिपाठ, रोज रात्री कीर्तन असे अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हनुमान जन्मोत्सवानिमित्त करण्यात आले होते . हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांना प्रसादाचे वाटप या वेळी करण्यात आले . तसेच वाखारवाडी(पुंडवाडी) येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी रोज पहाटे काकडा ,भजन तसेच रोज सकाळी एक तास रामजप, सायंकाळी हरिपाठ, व रोज रात्री हरीकीर्तन असे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साही आनंदी वातावरणात संपन्न झाले . या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांना पुरण पोळीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरातील अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर हनुमान जन्मोत्सवानिमित्त मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.