Breaking News

हनुमान जयंती उत्साहात


श्रीरामपूर येथील रेल्वेस्टेशन जवळील जागृत हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगरराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते पाळणा हलवून उत्सवाची सुरवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

हजारो भक्तांनी यावेळी हनुमानाचे दर्शन घेतले. मंदिराचे विश्‍वस्त मणिलाल पोरवाल, सचिव सचिन गुप्ता, कांचन गुप्ता, रवी पाटील, भारती फंड, रंजनाताई पाटील, नगरसेवक संजय फंड, दिलीप नागरे, सिद्धार्थ मुरकुटे, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, यांच्यासह शेकडो भाविकांनी यावेळी हनुमानाचे दर्शन घेतले. गुप्ता परिवाराच्या वतीने सायंकाळी महाप्रसाद व भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.