Breaking News

बेळपिंपळगाव येथे हनुमान जयंती उत्साहात


नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगावमध्ये राम नवमी ते हनुमान जयंतीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात हरेराम महाराज शास्त्री शिंगवे दत्ताचे यांचे संगीतमय, जिवंत देखावा यांच्या सह हनुमान चरित्र कथा रात्री 8ते 11या वेळेत ठेवण्यात आले होते. गेले सात दिवस गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या सात दिवसात गावातील व परिसरातील गावातील भाविकांनी श्री हनुमंतराय यांचे जिवन चरित्र श्रवण केले. यावेळी महाराजांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्या सारखे एकनिष्ठ, एक वचनी, जिवन जगावे असा उपदेश केला तसेच रोज रात्री हनुमंताराय ची कथा सांगितली शेवटी हनुमान जयंतीनिमित्त साहेबराव महाराज कांगुणे , वैष्णव सेवा आश्रम भोकर यांनी भगवान श्रीकृष्ण याचे जीवन चरित्र व हनुमंतरायाची महती सांगितली. बेलपिंपळगाव येथील जागृत असणारे देवस्थान श्री रोकडोबा हनुमान मंदिरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती व हनुमंताचे दर्शन घेतले तसेच फटाक्यांची अतिषबाजी करत उत्साह साजरा करण्यात आला. 

गावात अनेक ठिकाणी पताका लावण्यात आल्या होत्या. भजनी मंडळी यांनी हनुमंतराय ची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी महाराजांचे काल्याचे कीर्तन झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट, भजनी मंडळ व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. बेलपिंपळगाव येथील हनुमान जयंती साठी जिल्हा भरातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात संपूर्ण जिल्हाभर तसेच राज्यात बेलपिंपलगाव येथील रोकडोबा हनुमान मूर्ती सारखी स्वयंभू मूर्ति कुठ ही नाही या ठिकाणी केलेला नवस पूर्णत्वास जातो म्हणून या ठिकाणी हनुमान जयंती ला भविकांची गर्दी होत असते.