Breaking News

नागापुरच्या विकास कामास निधी कमी पडु देणार नाही - आमदार बाळासाहेब मुरकुटे

भेंडा - (प्रतिनिधी ) - नेवासा तालुक्यातील विकास कामापासून वंचित राहिलेले नागापूर येथे जलसंधारण अंतर्गत बंधार्‍याचे कामाचे भुमीपूजन करताना आमदार बाळासाहेब मुरकुटे बोलत होते. यावेळी निवृत्ती काळे, गोरक्षनाथ कापसे, संचालक ज्ञानेश्‍वर स. सा. का. भेंडा , महेश काळे, बाबासाहेब नवथर , सरपंच गोरक्षनाथ कापसे , अर्जुन कापसे, राजाराम कापसे , सुदाम कापसे, अ‍ॅड. संजय लवांडे , अ‍ॅड. संदिप कापसे , एकनाथ कापसे, एडुभाऊ सोनवने, तालुका कृषीअधिकारी आदि उपस्थित होते. आमदार मुरकुटे पुढे म्हणाले की दहा वर्षापासूनची या गावाची असलेली मागणी मी पुर्ण करु शकलो यामुळे मला खुप समाधान वाटत आहे. जलसंधारण मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या विशेष सहकार्याने या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.