Breaking News

टंचाई आढावा बैठकीतील प्रश्‍न त्वरीत मार्गी लावण्याचे आदेश - आमदार राजळे

पाथर्डी- (प्रतिनिधी) - तालुका टंचाई आढावा बैठक आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलाताना आ.मोनिका राजळे यांनी, टंचाई आढावा बैठकीत विविध गावातील सरपंच व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या प्रश्‍न ज्या त्या विभागाने मार्गी लावून त्या विभागाने आठ दिवसात अहवाल माझ्या कार्यालयाला लेखी स्वरुपात पाठवावा. जलयुक्त शिवाराच्या कामामुळे चांगली स्थिती निर्माण झाली आहे. शेवगाव पाथर्डी तालुक्यात सुमारे दीडशे ते दोनशे बंधारे झाले आहेत. गाळ काढणे, खोलीकरण व इतर कामामुळे पाणीसाठा वाढला आहे. तसेच आढावा बैठकीत सर्वाधिक तक्रारी विज वितरण कंपनी व भुमीअभिलेख कार्यालय आणि नगरपालिकेत अतिक्रमण व शासकिय भुखंड लाटल्याबाबत झाल्या. आमदार राजळे यांनी याबाबत अधिकार्‍यांना चौकशी करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

यावेळी या बैठकीसाठी पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर, प्रांताधिकारी डॉ.विक्रमसिंह बांदल, तहसीलदार नामदेव पाटील, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, जि.प. सदस्य राहुल राजळे, माजी जिल्हा परीषद सदस्य सोमनाथ खेडकर, पंचायत समीती सदस्य सुनिल ओव्हळ, रविंद्र वायकर, गोकुळ दौंड, सुनिल परदेशी, सुभाष केकाण , राहुल गवळी, पुरुषोत्तम आठरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, गटविकास अधिकारी
डॉ.जगदिश पालवे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, आगार प्रमुख अन्सार शेख, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, वनपरीक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे , नगराध्यक्ष मृंत्युजय गर्जे, उपनगराध्यक्ष बंजरंग घोडके उपस्थीत होते. यावेळी विविध गावातील सरपंच व कार्यकर्त्यांनी पिण्याचे पाणी उपलब्ध असतानाही किरकोळ दुरुस्ती अथवा तांत्रीक बिघाडामुळे पाणी मिळत नाही अशा तक्रारी केल्या. बहुतेक पाणी योजना जुन्या झाल्याने त्या पुर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. नव्याने योजना होण्याबाबत गावपातळीवर सरपंच व ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. तालुक्यात यावर्षी मे महीन्यात सुमारे चाळीस ते पन्नास गावात टँकरने पाणी द्यावे लागेल. एप्रिल महीन्यात पुरेल एवढेच पाणी असल्याचे अनेक ग्रामसेवकांनी सांगितले. यावेळी दत्तु पठाडे, वैभव आंधळे, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, सचिन नेहुल, कल्याण शेळके, बबन सुरासे, महादेव रहाटे, बाळासाहेब घुले, किरण पालवे, सुनिल पाखरे, प्रल्हाद राठोड , सतिष पालवे , सोमनाथ बोरुडे, नगरसेवक रमेश गोरे, मंगल कोकाटे,हुमायुन आतार, गणपत गर्जे, उध्दव माने, यांच्यासह विविध गावचे सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली आढावा बैठक अत्यंत शिस्तीत व प्रत्येकाचे म्हणणे ऐकुन घेत सायंकाळी पाच वाजता संपली. उपस्थितांचे आभार गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी मानले