Breaking News

देशात २४ बोगस विद्यापीठे : यूजीसी

मुंबई | विश्वविद्यालय किंवा विद्यापीठाची आपल्या संस्थेसमोर उपाधी लावणाऱ्या देशात २४ बोगस संस्था अाहेत, असा खुलासा करत या बोगस विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मंगळवारी केले आहे. कोणतेही विद्यापीठ हे केंद्र, राज्य किंवा प्रांताच्या अधिनियमाच्या मंजुरीनंतर किंवा विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम १९५६ अन्वये अस्तित्वात येतात. मात्र, देशात २४ संस्थांनी विश्वविद्यालय अशी उपाधी धारण केली आहे.