Breaking News

जमिनीची धूप रोखण्यासाठी २०३० पर्यंतचे केंद्राचे उद्दिष्ट'


वृत्तसंस्था | नवी दिल्ली जमिनीची धूप रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातून जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यासाठी २०३० पर्यंतचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. जमिनीचे वाळवंट होऊ नये या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्या दिशेने देशभरात प्रयत्न केले जात आहेत. देशात दुष्काळ, जमिनी कोरडवाहू होण्याची समस्या गंभीर झाली आहे. देशातील एकूण जमिनीपैकी ९.६४ कोटी हेक्टर जमिनीची धूप होण्याची भीती आहे. त्याचा दोन कोटी टन अन्नधान्य उत्पादनाला फटका होऊ बसू शकतो. जगातील ३० टक्के लोकसंख्या कोरडवाहू भागात राहते. युनेस्कोच्या २१ पैकी ८ जागतिक वारसा स्थळे नापिकी जमिनीवर आहेत.