Breaking News

रसायनाच्या आयातीवर शुल्क लावण्यावर विचार


नवी दिल्ली | केंद्र सरकारने फार्मा आणि कृषी क्षेत्रात वापर होणाऱ्या एका रसायनाला चार देशांमधून आयातीवर ९२.२३ डॉलर प्रतिटन अँटी डम्पिंग ड्यूटी लावण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. या चार देशांमध्ये इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे. अँटी डम्पिंग नियामक डायरेक्टोरेट जनरल ऑफ अँटी डम्पिंग अँड अलाइड ड्यूटीज' (डीजीएडी) 'सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोल्स'च्या स्वस्त आयात तक्रारीची चौकशी करत आहे.