जामखेडची कायदा सुव्यवस्था ढासळली
जामखेडचे गुंडाराज बिहार, उत्तरप्रदेशला लाजवेल असे झाले आहे. लोकांनी स्थलांतर करावे का? असा उपरोधिक सवाल नागरिक पालकमंत्र्यांना करत आहेत. राम शिंदे यांचे मी या गावाचाच नाही असे घेणे देणे नसल्यासारखे वागणे नागरिकांना खटकत आहे.
जामखेडच्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेमुळे जामखेडमध्ये कायम दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी व शहरात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, सर्व छोटे-मोठे व्यवसायिक, व्यापारी, नागरिक यांच्या बैठकीचे आज सकाळी 10:30 वा. महावीर भवन येथे आयोजन करण्यात आले आहे.