Breaking News

विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन


पुणे, विभागप्रमुख हे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत असून शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन मानसिक छळ करत असल्याचा आरोप करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे.

विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या परीक्षा आजपासून सुरू होणार होत्या. त्या परीक्षा 15 तारखेपर्यंत पुढे ढक लाव्यात, एलजीबीटी विषयासंदर्भात शिक्षकांबद्दल तक्रारी असून त्यांच्यावर कारवाई करावी, विभागप्रमुख हे विद्यार्थ्यांमध्ये शहरी ग्रामीण, तसेच भाषिक भेदभाव करत असून त्यांना हटवण्यात यावे, तसेच इतर सहायक शिक्षकांना अपात्रतेच्या तत्वावर हटवावे अशी मागणी करत हे विद्यार्थी आजपासून आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्याशी विभागातील शिक्षकांनी केलेली चर्चा अपयशी ठरली असून, कुलगुरूंनी यात लक्ष घालण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे