Breaking News

चंदन घेऊन जाणारा कंटेनर वाकड पोलिसांनी पकडला


पुणे, बेकायदेशीररित्या रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर वाकड पोलिसांनी सापळा रचून पकडला. या कंटेनरमध्ये सुमारे 10 कोटीचे रक्तचंदन असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ताथवडे जवळ आज सकाळी साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. 

पोलिसांनी ताथवडे जवळ पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास सापळा रचला. ताथवडे येथे कंटेनर आला असता पोलिसांना तो अडवला. त्यामध्ये पाहणी केली असता रक्तचंदन आढळून आले.याबाबत पोलिसांनी वनविभागास कळविले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी रक्तचंदनाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हे रक्तचंदन सुमारे 10 कोटी रुपयांचे असल्याचा अंदाज वर्तविला.