Breaking News

सावरगाव येथे ग्रामस्थ, भारतीय जैन संघटनेच्या वतीने श्रमदानाची चळवळ

तालुक्यातील सावरगाव (मारूतीचे) येथे पाणी फौंडेशन अंतर्गत श्रमदानासाठी भारतीय जैन संघटना व ग्रामस्थांनी चढमाथ्यावर चर खोदून श्रमदान केले. तसेच गावातील लोकांना श्रमदानसाठी प्रोत्साहीत करण्यासाठी गावातून फेरी काढून घोषणा दिल्या. गावागातील दुष्काळ हटवण्यासाठी पाणी फौंडेशन व भारतीय जैन संघटना राबवीत असलेल्या कामाची माहिती दिली.


भारतीय जैन संघटना व पाणी फौंडेशनचे तालुका समन्वय प्रवीण चोरडिया, पिपल्स एज्युकेशन संस्थेचे सहसचिव व उद्योजक दिलीप गुगळे यांनी सावरगाव गावात श्रमदान करण्याची तयारी दर्शवली, व भारतीय जैन संघटनेच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी श्रमदान करण्याबाबत सुचवले. 
मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास संतोष फिरोदिया, आनंद गुगळे, जितेंद्र बोरा, मनोज भंडारी, संजय कटारिया, सुमतीलाल गांधी, अभय कासवा, अमोल ताथेड, आशुतोष छाजेड, चेतन सुराणा, कांतीलाल बोथरा, अभय शिंगवी, महावीर बाफना, अमित बोथरा, रसिक बोथरा, निलेश बोरा, विकास कस्तुरे, दानीश पठाण, मनाली गुगळे, रियाज शेख, अशोक वीर, नासीर पठाण, सावरगाव सरपंच काकासाहेब चव्हाण, दादासाहेब ढवळे यांच्यासह ग्रामस्थांनी सावरगाव पासून 1 कि.मी. अंतरावरील चढमाथ्यावर चर खोदून पाणी फौंडेशनच्या गीताच्या व हलगीच्या तालावर सुमारे 2 तास काम केले. 
यावेळी पाणी फौंडेशनचे तालुका समन्वयक संतोष दहिफळे, राहूल ढगे, दिलीप बंडाळे, शुभम साबळे, सुधीर संगारे व उद्योजक दिलीप गुगळे, प्रवीण चोरडिया यांनी ग्रामस्थांना श्रमदान करण्याबाबत पटवून देण्यासाठी सावरगावातून फेरी काढली. यावेळी हम सब एक साथ दुष्काळाशी दोन हाथ, माती अडवा पाणी जिरवा, अन्न गुडगुडे नाल गुडगुडे डिशॉव, डिशॉव, डिशॉव. जय जवान जय किसान, भारत माता की जय अशा घोषणा देऊन गाव दणाणून सोडले. यानंतर मानवी साखळी करून एकत्र झाले. उद्योजक दिलीप गुगळे यांनी गावातील दुष्काळ संपवून गाव पाणीदार व्हावे यासाठी पाणी फौंडेशन व भारतीय जैन संघटना यांचमार्फत घेत असलेल्या उपक्रमाची माहिती देऊन ग्रामस्थांनी आपसातील हेवेदावे, मतभेद बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. व श्रमदान करून गाव सुजलाम सुफलाम करण्याचे आवाहन केले. 
( सावरगाव येथे भारतीय जैन संघटनेच्या वतीने जनजागरण फेरी काढण्यात आली. तसेच चढमाथ्यावर ग्रामस्था समवेत चर खोदून श्रमदान केले.)