Breaking News

वादळी वार्‍यासह पावसाचा फळबागांना तडाखा


तालुक्यामध्ये काल वादळासह पाऊसाचा चांगलाच तडाखा बसला. अवकाळी पावसामुळे लिंबू, डाळिंब द्राक्षे यांचे प्रचंड नुकसान झाले. एवढे दिवस कुकङीच्या पाण्यासाठी त्रासलेला शेतकरी आज दुहेरी संकटात सापडला आहे. काल 4 वा. अचानक सुरू झालेल्या सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाने चांगलाच कहर घातला. या वार्‍यासह पावसाने होत्यााचे नव्हते झाले, फळांचे आतोनात मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांकडून तहसिलदारांना फळबागेचे पंचनामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.