Breaking News

फक्राबादच्या जि.प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

तालुक्यातील फक्राबाद येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रतन तुपेरे, माजी जि.प. सदस्य विश्‍वनाथ राऊत, सरपंच दिगांबर जगताप, पोलीस पाटील योगेश जायभाय, केंद्रप्रमुख सुरेश कुंभार यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मौलाना अबुल कलाम आझाद यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक राम निकम यांनी प्रास्ताविक केले. स्नेहसंमेलनात चिमुकल्यांचा विविध कलागुणांचा गुणदर्शन कार्यक्रम सादर झाला. इ. 1 लीचा गाडी झुमक्याची, ब्राझील डान्स, इ. 2 री चे पाणी फाउंडेशनचे तुफान आलया, व ओ राजे, इ.3 री चे नवलाई माझी लाडाची, दिल है छोटासा, इ. 4 थीचे दर्या किनारो हे कोळी गीत, लिंबोणीचे लिंबू आदी विद्यार्थ्यांनी गाणी सादर करून, विद्यार्थ्यांना पारितोषिकेही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमास केंद्रप्रमुख नारायण लहाने, गणपत चव्हाण, मोहन खवळे, विकास बगाडे, युवराज जाधव, संतोष वाघ, अंकुश ओमासे, जालिंदर राऊत, दीपक मोहळकर, वैशाली घुमरे- सोले, सूर्यकांत जाधव, बापूसाहेब जायभाय, पांडुरंग ओमासे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रा.पं. सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्या राम निकम, गौतम सोले, कांतीराम बरडे, प्रवीण शिंदे, स्वप्नील सवई, जयश्री पाटील, सरस्वती माने, मीरा डमाळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम सोले व जयश्री पाटील यांनी तर आभार प्रवीण शिंदे यांनी मानले.