Breaking News

गावाला पाणीदार करण्यासाठी वाडेगव्हानच्या विद्या र्थ्यां चे श्रमदान

पाणी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत वाडेगव्हाण गावाने सहभाग घेतला आहे. सुमारे साडे तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातून पानी फाऊंडेशनच्या प्रशिक्षणास जाण्यासाठी कोणीही तयार झाले नाही. अखेर गावातील प्राथमिक शिक्षक दिपक गोटे आणि प्रगतशील शेतकरी दिपक खंदारे यांनी स्वतःच्या कामाचा व्याप बाजूला ठेवून प्रशिक्षणास जायचे ठरविले. त्यांना सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वारे, मुख्याध्यापिका कविता गोटे, अंकिता वाघमारे, तुषार गोटे आणि तालुका समन्वयक शरद घनवट, जलमित्र राजेंद्र गुंजाळ यांनी सहकार्य केले. प्रशिक्षण घेऊन गावात आल्यानंतर सर्वांनी गावातील सर्व वाड्या वस्त्यांवर शिवार सभा घेऊन लोकांना जलसंधारणाचे महत्व पटवून दिले. मात्र तरीदेखील लोकांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर प्रशिक्षण प्रमुख दिपक खंदारे आणि दिपक गोटे यांनी श्रमदानासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे ठरविले. मग जिल्हा परिषद शाळा व प्रभु विद्याधाम शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून श्रमदान केले.

दुष्काळाशी दोन हात व शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी अभिनेता आमिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप पाणी फाऊंडेशनअंतर्गत पारनेर तालुक्यातील वाडेगव्हान येथे श्रमदानाने सुरुवात करण्यात आली.
मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी केवळ 3 तासात एकजुटीने अखंड श्रमदान केले. यामुळे कोणत्याही जेसीबी किंवा पॉकलेन मशीन पेक्षाही अधिक असे 90 घन मीटर कन्टुर दगडी बांध तयार करण्याचे काम केले. त्याची क्षमता 90 हजार लिटर पाणी साठविण्याची आहे. वरील न भूतो न भविष्यति असे जलसंधारणाचे काम केवळ विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने झाले आहे.