Breaking News

शेवगाव तहसील कार्यालयात पुरवठा दक्षता समितीची बैठक संपन्न


शेवगाव तहसील कार्यालयात पुरवठा दक्षता समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली, शेवगाव तहसील कार्यालयामध्ये पार पडलेल्या या बैठकीत, पुरवठा विभागाच्या विविध प्रश्‍नांच्या संदर्भात सविस्तरपणे या बैठकीत चर्चा करण्यात आली, ही बैठक शेवगावचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पुरवठा विभागाच्या बैठकीमध्ये विभक्त शिधापत्रिका व नवीन शिधापत्रिका बाबत चर्चा करण्यात आली, गरजू व वंचित लाभार्थ्यांना शिधापत्रिका देण्याचा ठराव या बैठकीमध्ये संमत करण्यात आला, या बैठकीमध्ये पुरवठा दक्षता समितीचे सदस्य जलीलराजे यांनी गॅस एजन्सी व पेट्रोल पंप आणि स्वस्त धान्य दुकान यांच्या दर्शनीय भागामध्ये दक्षता कमिटीच्या सदस्यांची नावे मोबाईल नंबर सहीत फलकावर लावण्याची सूचना मांडली व समितीचे सचिव तहसीलदार दीपक पाटील यांनी तात्काळ मान्य केली, पुरवठा व वितरण व्यवस्थेशी संबंधित तालुक्यातील काही तक्रारी असतील तर, संबंधित तक्रारदाराने तालुक्याच्या दक्षता समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा असे समितीच्या वतीने सांगण्यात आले. ज्या लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे वितरण व्यवस्थेच्या मशीनशी जुळत नसतील अशा लाभार्थ्यांना महिन्याच्या शेवटी पुरवठा अधिकारी यांच्या समक्ष धान्य वाटप करण्यात येईल, व त्यामुळे यापुढे कोणताही लाभार्थी स्वस्त धान्यांपासून वंचित राहणार नाही, असे तहसीलदार दीपक पाटील यांनी सांगितले.यावेळी या समितीच्या बैठकीला शेवगाव चे तहसीलदार दीपक पाटील, पुरवठा विभागाचे ए.डी.कुलकर्णी, कलीम शेख, नायब तहसीलदार बी.एस. गुंजाळ, तसेच दक्षता समितीचे सदस्य जलील राजे, माऊली निमसे, अमोल फडके, सुनील मगर, बन्सीधर आगळे, शेवगाव नगर परिषदेचे राजू इंगळे, पं.स.चे.बी.एस.कासार आदि मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. गॅस एजन्सी पेट्रोल पंप व स्वस्त धान्य दुकानावर यापुढे दक्षता समितीच्या सदस्यांच्या नावाचे लावले जाणारे फलक व सदस्यांचे दूरध्वनी क्रमांक यामुळे वितरण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराला यामुळे वचक बसणार आहे.