Breaking News

दादांच्या पालकत्वाला जळगाव साबांचा दिडशे कोटींचा आहेर

मंत्रालय आणि आमदार निवास सारख्या जागृत ठिकाणी सार्वाजनिक बांधकाम अभियंत्यांनी दाखवलेल्या हातचलाखीने साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील त्रस्त झाले असतानाच त्यांनी पालकत्व स्वीकारलेल्या जळगाव साबांतही अधिक्षक अभियंता सोनवणे आणि त्यांच्या अखत्यारीतील तीन कार्यकारी अभियंत्यांनी तब्बल दिडशे कोटींचा गोलमाल केल्याचे समोर आले आहे. जळगावच्या या नव्या डोके दुःखीने दादांसमोर आणखी एक अडचण उभी ठाकली आहे.


महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात मुंबईपासून नागपूरपर्यंत कोल्हापुरपासून नाशिकपर्यंत सर्वदूर भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. हे आर्थिक वर्ष संपत असतांना मुंबई साबां प्रादेशिक विभागासोबत नाशिक साबां प्रादेशिक विभागातील काही गैरव्यवहार माध्यमांच्या वेशीवर टांगले जाऊ लागले आहेत. विशेषतः जळगाव साबां मंडळातील सुबेशी संबंधीत लेखा शिर्ष 3054 अंतर्गत देखभाल दुरूस्तीच्या कामातील घोळ चर्चेत आला असून अधिक्षक अभियंता सोनवणे आणि तीन कार्यकारी अभियंत्यांची कार्यशैलीवर संशय व्यक्त केला जात आहे. या चौकडीने तब्बल दिडशे कोटींचा घोळ केला असल्याची चर्चा आहे.
गेल्या वर्षभरापासून मुंबई साबां प्रादेशिक विभागातील विविध साबां मंडळातील भ्रष्टाचारावर गंभीर चर्चा सुरू आहे. विधीमंडळ, लोकप्रतिनिधी आणि माध्यमे या सर्वांचे लक्ष या भ्रष्टाचाराने खिळवून ठेवले. त्याचा नेमका फायदा महाराष्ट्रातील इतर साबां विभागांनी अलगद उचलला. सर्व मंडळी मुंबईता व्यस्त आहेत, याचा फायदा घेऊन इकडे विविध लेखा शिर्षाखाली मंजूर निधींची परस्पर विल्हेवाट लावली गेली.
याच जातकुळीतील जळगाव साबां मंडळातील एक प्रकरण लोकमंथनच्या हाती आले असून अधिक्षक अभियंता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव विभाग एकचे कार्यकारी अ भियंता पाटील, विभाग दोनचे कार्यकारी अभियंता गायकवाड आणि उत्तर जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता परदेशी या चौघांनी संगनमताने देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली दिडशे कोटींचा घोळ केला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे असल्याने सुबेशी संबंधीत लेखा शिर्ष 3054 अंतर्गत अधिक्षक अभियंता सोनवणे आ णि कंपनीने केलेला दिडशे कोटीचा घोळ गंभीर मानला जात आहे. (क्रमशः)