चुगलखोर दत्तु गितेंच्या कारनाम्यांमुळे भिवंडीत एमएमआरडीए निधीचा घोळ
शासनाचे धोरण आणि अंमलबजावणी करणारे प्रशासकीय हात यांची योग्य सांगड निर्माण झाली तर विकास व्हायला वेळ लागत नाही.तथापी या साखळीत एखाद दुसरा दुवा नादान निघाला तर विकास योजनांचे कल्याण होऊन भिवंडीसारखी परिस्थिती निर्माण होते. ठाणे जिल्हा परिषदेच्या बाधकाम विभागाच्या भिवंडी उपविभागात सध्या हेच भेसूर अन बेसूर चित्र निर्माण झाले आहे. ठाणेकरांच्या सुदैवाने विवेक भिमनवार यांच्यासारखे कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यरत असूनही शाखा अभियंता दत्तु गितेंच्या कर्म दारिद्याचे नजर लागल्याने विकास योजनांचा खेळखंडोबा सुरू आहे.
एमएमआरडीए आणि पीएमवायजेसी या शासनाच्या दोन महत्वाकांक्षी विकास योजनांच्या माध्यमातून शहर आणि ग्रामिण भागाचा चौफेर विकास करण्याचे धोरण स्वागतार्ह आहे. मुंबई महानगरच्या बगलेत असलेल्या भागाचा समावेश एमएमआरडीएमध्ये करून त्या विभागाचा विकास करण्याच्या हेतूने ठाणे जिल्ह्याचा समावेश एमएमआरडीएत करण्यात आला. तथापी या विभागात आधीच कार्यरत असलेल्या शाखा अभियंता दत्तु गिते सारख्या चुगलखोरांनी तांत्रिकदृष्ट्या कुशल असलेले कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना या ठिकाणी काम करणे जिकरीचे केले. यापुर्वी कार्यकारी अभियंता म्हणून या ठिकाणी कार्यरत असलेले बाबीस्कर यांना जाणीवपुर्वक एसीबीच्या सापळ्यात अडकवून बाजुला सारले. या घटनेपासून कुशाग्र कुशल तांत्रिक दृष्ट्या पात्र अभियंते अथवा सहाय्यक तंत्रज्ञ या ठिकाणी काम करण्यास धजावत नाहीत. इतकी दत्तु गितेंने या विभागात दहशत निर्माण केली आहे.
कुशल तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने एमएमआरडीए अंतर्गत राबवल्या जात असलेल्या योजनांवरील निधी आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक तेव्हढा खर्च होत नाही. त्याचा फायदा दत्तु गितेंसारखे शाखा अभियंता उचलत असल्याचे या आर्थिक वर्षात प्रकर्षाने जाणवत आहे. 31 मार्च अखेर शिल्लक असलेला निधी शासनाला परत जाणे अपेक्षित असतांना शिल्लक निधी परत न करता जुन जुलै अखेर या निधीवर काम केल्याचे दर्शवून परस्पर हडप करण्याचे कारस्थान सुरू आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्तांत उद्याच्या अंकात. (क्रमशः)