कर्जत तालुका राजकीय वार्तापत्र
2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे आत्ता पासुनच कर्जत तालुक्यातील नेते मंडळींमध्ये संचारले असून, पाच वर्ष निद्रावस्थेत असलेले नेते मंडळी हडबडून जागे झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील नेतेमंडळी आपापले कार्यकर्ते बांधणीच्या कामाला लागले असून कोणत्या भागात कोणत्या समस्या आहेत, ते शोधून त्यांची सोडवणूक, त्यांचे निराकरण करून जनतेसमोर आपणच भावी नेता असल्याचे दाखवून देण्याची जणूकाही चढाओढच लागली असल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळत आहे.
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तस तसे नेते मंडळी कोणत्यान् कोणत्या कार्यक्रमाचे औचित्य साधत स्वत: जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेच्या दृष्टीने अनेक नेते मंडळींनी आत्तापासुनच कंबर कसली आहे. त्यानिमित्ताने जोरदारपणे शक्तीप्रर्दशन करताना दिसत आहेत. दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये खा. दिलीप गांधी यांनी माजी खा. तुकाराम गडाख यांचा पाच वर्षाचा खासदारकीचा काळ वगळता 15 वर्षे चांगले संसदपटू म्हणुन काम केले, या दरम्यान केंद्रीयमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव ही त्यांच्या गाठीशी आहे.
खा. गांधींचे दुर्लक्ष...
चालू पंचवार्षिकमध्ये मात्र गांधी यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. अनेक खंदे समर्थक कार्यकर्तेदेखील त्यांच्यापासून दुरावले गेले आहेत, भाजपामध्ये देखील स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर गटबाजी पहावयास मिळत आहे. गांधींना माननारा गट, अॅड. अभय आगरकर यांना माणनारा गट, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांचा वेगळा गट निर्माण झाल्याने गांधी आजमितीस तरी अडचनीत आल्याचे चित्र कर्जत तालुक्यात पहावयास मिळते आहे.
विखेंनी दंड थोपडले.
उत्तरेचे नेते डॉ. सुजय विखे यांनी नगर दक्षिण लोकसभेसाठी दंड थोपटत संपुर्ण मतदार संघच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन पिंजुन काढत कार्यकर्त्यांची मोट बांधणी करण्यास सुरवात केली आहे. येणार्या लोकसभेचा भावी खासदार आपणच असल्याच्या अविर्भावात आपली छाप आणि पकड मजबूत करण्याचा सपाटा विखे पाटलांनी लावला आहे. तसे वारे निर्माण करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. विखुरलेल्या काँग्रेसच्या नेते मंडळींना एकत्र करत तालुक्यामधील काँग्रेसची मरगळ काढत तयारीला लागण्याचा संदेश देऊन संपुर्ण मतदार संघच पिंजून काढण्याचे काम सुरू केले आहे.
विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना गेली 2-3 वर्षे तसे अडचणिचेच गेले, त्यांना कधी प्रकृतीने तर कधी नशिबाने न दिलेली साथ, त्याचबरोबर महानगरपालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छ. शिवाजी महाराजांविषयी वापरलेली अर्वाच्च भाषा अन् त्यावरून झालेले राजकरणाचे महाभारत, अण्णा हजारे यांचे राम लिला मैदानावरील उपोषण यासर्व गोष्टी गांधी यांना अडचनिच्याच गेल्या, त्यातच सुजय विखेंचा झेंडा उत्तरेकडून दक्षिणेकडे आला, यासर्व गोष्टी पाहता दिलीप गांधी यांच्यानंतर राजकारणात आलेले जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पक्षामध्ये चांगले वर्चस्व निर्माण करून मुख्यमंत्र्यांचे विश्वासू व निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. तसे पाहिले तर जिल्ह्याबरोबरच राज्यामध्ये प्रा. राम शिंदे यांना माणनारा एक मोठा वर्ग तयार झाला आहे.
याचाच फायदा म्हणुन प्रा. राम शिंदे यांना नगर दक्षिण लोकसभेची ऊमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्रीमंडळातील उजवा हात व विश्वासू राम शिंदे जर केंद्रामध्ये गेले तर राज्याला हिताचे व हक्काचा माणूस भेटेल याच गोष्टींचा विचार करून भाजपाची लोकसभा उमेदवारी प्रा. राम शिंदे यांना देऊन डॉ. सुजय विखे यांच्यासमोर भाजप आव्हान उभे करेल असे बोलले जात आहे.
प्रा. राम शिंदे यांना जर लोकसभेची उमेदवारी दिली गेली तर, कर्जत-जामखेड विधानसभेची उमेदवारी कर्जत शहराचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांना देऊन, या मतदार संघामध्ये कायमस्वरूपी वर्चस्व राहील, अशी तयारी पक्षाने केल्याचे बोलले जाते. नामदेव राऊत यांनी देखील जोरदार तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत असून त्यास ना. राम शिंदे यांची सहमती असू शकते.
राऊत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत संपुर्ण मतदार संघामध्ये जाऊन पहिला दौरा पूर्ण करत आपल्या हितचिंतकांच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. या वाढदिवसानिमित्त झी मराठी वर अनेक दिवसांपासुन धुमाकुळ घालुन प्रत्येकाची मने जिंकणारा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम कर्जत शहरामध्ये मोफत दाखवून एक प्रकारची हवाच केली. तसे पाहिले तर मतदार संघामध्ये भाजपा बरोबरच बाकी सर्वच पक्षांना घरघरच लागलेली आहे. प्रा. राम शिंदे यांनी दहा वर्षांच्या काळामध्ये मोठ्या संख्यने कार्यकर्ते आपलेसे केले आहेत. त्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, तालुध्यक्ष अशोक खेडकर, नगराध्यक्ष नामदेव राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार, उपसभापती प्रकाश शिंदे, सभापती पुष्पा शेळके, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, कोरेगावचे सरपंच बापूराव शेळके, दुरगावचे सरपंच अशोक जायभाय, स्वप्निल देसाई, डॉ. रमेश झरकर, अल्लाऊद्दीन काझी, शांतिलाल कोपनर यांनी साथ देत मतदार संघाचा विकास साधला आहे. तालुक्यात जलसंधारणांची झालेली कामे, तुकाई चारीचा मार्गी लावलेला महत्वाचा प्रश्न, राज्य पातळीच्या झालेल्या कबड्डी स्पर्धा, हळगाव येथे मंजुर झालेले कृषी महाविद्यालय यासर्व गोष्टींमुळे कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये भाजपाला सध्यातरी अच्छे दिन आलेचे दिसत आहे.
भाजपला आव्हान देऊ शकेल असे नाव सध्या तरी चर्चेत दिसून येत नाही. अजित पवार हे लढणार असल्याची फक्त अफवाच जोरदार पसरवली जात असून अद्यापि पवारांकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा गुंड यांचे नाव अधून मधून कार्यकर्ते घेत असतात, मात्र त्यांचे नावाला सर्वांकडून सहमती मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. ना. राम शिंदे यांना आज तरी एकच व्यक्ती टक्कर देऊ शकते, ती म्हणजे विद्यमान नगराध्यक्ष नामदेव राऊत. आगामी निवडणुकीत ना. शिंदेंनी पुन्हा विधानसभा लढवायचे ठरवल्यास त्यावेळी राऊत यांची भूमिका महत्वाची ठरणार असून राऊत यांनी ना. शिंदे यांचे विरुध्द शड्डू ठोकल्यास ना. शिंदे चा राऊत घाम काढतील अशी चर्चा सुरू असून राऊत यांचे समर्थक कामालाही लागले असल्याचे पहावयास मिळत आहे.