नागरदेवळे रस्ता भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपींवर कारवाईची मागणी
झोडगे यांनी दोषींवर कारवाई होण्यासाठी गुरुवार दि.26 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलनास बसले होते. दिला. कारवाई होत नाही तो पर्यंन्त आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने रात्री उशीरा 11 वाजे पर्यंन्त आंदोलन चालू होते. जि.प. सदस्य शरद झोडगे यांनी मध्यस्ती करुन, उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिर्के यांनी आरोपींवर दोन दिवसात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी भागचंद तागडकर, करण गारदे, पवन भिंगारदिवे, दिपक क्षीरसागर, प्रविण भंडारी, प्रविण गारदे, कुंदन जाधव, प्रताप भिंगारदिवे आदि उपस्थित होते.
नागरदेवळे ग्रामपंचायत मधील सदर गैरव्यवहार ग्रा.पं. सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला पुराव्यासह निदर्शनास आनून दिले होते. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या आंदोलनाची दखल घेत चौकशी समिती नेमून या कामाची प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली. चौकशी समितीने ग्रामविकास अधिकारी एस.आर. पुंड, जे.जि. ठुबे, एम.आर. बनकर, आर.एम. आबुज, माजी सरपंच राम शंकरराव पानमळकर, सरपंच सविता राम पानमळकर, तत्कालीन अभियंता एस.व्ही. भागवत, तत्कालीन शाखा अभियंता सी.डी. लाटे, ए.आर. गावडे यांना नोटीसा बजावल्या होत्या. यानंतर दिड महिना उलटून देखील संबंधीतांवर कारवाई केली जात नसल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोषींवर कारवाई होण्यासाठी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.