Breaking News

अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठाणच्यावतीने पाणपोई


पाथर्डी (प्रतिनिधी) - अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने व नगरसेवक प्रसाद आव्हाड यांच्या संकल्पनेतून माजी आमदार बाबूजी आव्हाड यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त माणिकदौडी 
चौकात पाणपोईचे उद्धघाटन नगराध्यक्ष मृत्यूजय गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी म्हटले की माणिकदौंडी चौक हा मध्यवर्ती चौक असुन याच्या शेजारीच आठवडे बाजार भरतो तसेच या रोडवरून धामणगाव देवी, वनदेव 
जाण्यासाठी नेहमीच वर्दळ असते. प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय उन्हाळ्यात व्हावी यासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी पाणपोई सुरु करण्यात आली. यावेळी युवा नेते प्रशांत शेळके ,पत्रकार 

नितीन गटाणी, भैय्या थोरात, गौरव पाथरकर, लहाणू लबडे, अश्रू पवार, भाऊ शिरसाठ,गोटू फाजगे,पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, बबलू घुले, प्रसाद देशमुख आदि उपस्थित होते.