शेतकर्यांच्या प्रश्नांवर सोमवारी भाकपचा हल्लाबोल
नगर । प्रतिनिधी - भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासह विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी नाशिक येथील विभागीय कार्यालयावर सोमवारी (दि. 16) दुपारी 1 वाजता शेतकरी, कामगार व असंघटीत कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सहसचिव कॉ.अॅड.सुभाष लांडे यांनी दिली. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे राज्य सचिव कॉ.तुकाराम भस्मे, राज्य सहसचिव कॉ. अॅड. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ.स्मिता पानसरे (नगर), कॉ.राजू देसले (नाशिक), जिल्हा सचिव कॉ.शांताराम वाळूंज, कॉ.भास्कर शिंदे (नाशिक), कॉ.हिरालाल परदेशी (धुळे), कॉ.माणिक सूर्यवशी (नंदुरबार) आदी करणार आहेत.