Breaking News

१४ महिन्यांच्या बालकाचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू


सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे पाण्याच्या हौदात पडून १४ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २६) सकाळी घडली. स्वराज विजय गाडे असे मृत बालकाचे नाव आहे. हौदात पाण्याचा पंपही सुरू होता, हे पाणी नाकातोंडात गेल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेने गाडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.