Breaking News

वाचनाने कल्पनाशक्तीला चालना : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी - इंटरनेट, फेसबुक, व्हाटसअॅपमुळे एका क्लिकवर जगात घडणा-या गोष्टींची माहिती मिळू लागली. त्यामुळे आज वाचनाची गोडी अतिशय कमी झाली आहे. प्रत्येक व्यक्तीकडे असलेले ज्ञान ही त्या व्यक्तीची शक्ती असते. या शक्तीला वाचनाची जोड दिल्यास ज्ञानामध्ये भर पडून त्या व्यक्तीचे भविष्य उज्वल होण्यास मदत होते. मनुष्याच्या कल्पनाशक्तीला वाचनामुळे चालना मिळते, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले.

माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमित्त येथील कर्मवीर प्रतिष्ठानच्यावतीने कोपरगाव शहरातील कर्मवीर वाचनालयाचे उदघाटन व विरसम्राट प्रतिष्ठानच्या फलकाच्या अनावरणप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘वाचाल तर वाचाल' हा विचार आजच्या घडीला किती समर्पक आहे, याची सर्वांना जाणीव आहे. परंतु याकडे कुणीही गांभीर्याने पहायला तयार नाही. आज या ठिकाणी सुरु करण्यात आलेले वाचनालय अतिशय स्तुत्य उप्रकम आहे. प्रत्येकाने वाचनाचे महत्त्व जपतांना पुस्तकांशी असलेले मैत्रीचे घट्ट नाते अबाधित राखायला हवे. तरच वाचन संस्कृतीचा होणारा -हास रोखण्यास निश्चितपणे मदत होईल. 

याप्रसंगी विरसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र आभाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दीपक साळुंके, विजय आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक संदीप पगारे, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, चंद्रशेखर आव्हाड, प्रदीप कु-हाडे, प्रसाद उदावंत, सचिन बडे, किरण पवार, चंद्रशेखर म्हस्के, स्वप्नील पवार, डॉ. तुषार गलांडे, ऋषिकेश खैरनार, कुलदीप लवांडे, फिरोज पठाण आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.