Breaking News

शिर्डीत विकासकामांचा धडाका सुरुच राहणार : विखे


आश्वी : प्रतिनिधी - शिर्डी मतदारसंघात २००९ ला जोर्वे गावचा समावेश झाल्यानंतर येथील विकासकामांचे शिवधनुष्य दिवगंत पद्मभूषण बाळासाहेब विखे आणि येथील ग्रामस्थांच्या पाठबळामुळे पेलता आले. जोर्वे येथे ९ कोटी ५६ लाखांची विकासकामे आजपर्यत मजूंर केली आहेत. त्यामुळे जोर्वेबरोबरच शिर्डी मतदारसंघात विकास कामाचा धडाका सुरुच राहणार आहे, असा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे आयोजित विविध विकासकामांचे भूमीपुजन आणि उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भागवतराव इंगळे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अँड. रोहिण निघुते, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, बाळासाहेब भवर, बापूसाहेब गुळवे, भास्क दिघे, निवृत्ती सांगळे, शरद थोरात, उपसरपंच गोकुळ दिघे, अँड. दिपक थोरात, भगवान इलग, भागवंत उंबरकर, बाळासाहेब जोर्वेकर, अँड. अनिल भोसले, देविदास वाळेकर, गौरव सांबरे, प्रातांधिकारी भागवंत डोईफोडे, गटविकास अधिकारी सुरेश शिदे आदी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनातून पात्र लाभार्थ्यांना विखे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. विखे म्हणाले, कृषीमंत्री असतांना शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात शेती साहित्य वाटप केले होते. लोकाभिमुख कामे केल्यामुळे आपण सर्वांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून दिले. त्यामुळे आदरणीय सोनिया गांधी व अध्यक्ष राहुल गांधी यानी राज्याच्या विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपवली. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, मराठवाडा दुष्काळ, कमला मिल आग या मुद्यावर सरकार निष्क्रीय झाल्याने शासनाला विरोधी पक्षाने जागे करण्याचे काम केले आहे. यावेळी जोर्वेसह पंचक्रोशीतील लाभार्थी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.