गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून अॅक्शन प्लॅन तयार
येथील घटना दुर्देवी असुन या घटेनचा तपास सध्या सुरु आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही जणांना ताब्यात घेतले असुन तपासातून जामखेड येथील घटना राजकीय वैमनस्यातून ही घटना नाही अशी बाब पुढे येत आहे. मात्र तपासात सर्व बाबी निष्पन्न होईल अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जिल्हयातील गुन्हेगांराच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी अॅक्शन प्लॅन तयार केला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावठी कट्टे आणि बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करणार्यांना तसेच गुन्हेगारीचे समुळ उच्चांटन करण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. केडगाव व जामखेड येथील हत्यांकांंडानंतर घटनेचा आढावा घेण्यासाठी केसरकर हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलिस महानिरिक्षक विनयकुमार चोबे, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजकुमार शर्मा आदी उपस्थित होते. दिपक केसरकर म्हणाले की, जामखेड येथील हत्याकांडामध्ये जे जे दोषी आहे त्यांचा छडा लावला जाईल. या प्रकरणात ज्यांनी मदत केली. त्यांनाही अटक केली जाईल तसेच इतरांची चौकशीसुध्दा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जामखेडचे हत्याकांड प्रथमदर्शनी पाणी उडवण्यावरुन झाले असल्याचे दिसत आहे. पण पोलिस तपास सुरु आहे. तपासानंतर सर्वकाही निष्पन्न होईल असे त्यांनी स्पष्ट केले. केडगाव तसेच जामखेड येथील हत्याकांडामध्ये अवैध शस्त्राचा वापर झाला आहे. आगामी काळामध्ये गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने मास्टर प्लॅन तयार केला आहे. तो आपण पाहिला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहे असे ही केसरकर म्हणाले.