काबुल बॉम्बस्फोटांनी हादरले ; पत्रकारासह 20 जणांचा मृत्यू
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास एकापाठोपाठ दोन स्फोट झाले आहेत. या दोन स्फोटामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला असून, 30जण जखमी आहेत. या स्फोटात एएफपी या वृत्तसंस्थेच्या काही पत्रकारांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय यात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.
दोन्ही स्फोट आत्मघाती हल्लेखोरांनी केल्याची माहिती काबूल पोलिसांच्या प्रमुखांचे प्रवक्ते हशमत स्टानेकझई यांनी दिली आहे. यातील पहिला आत्मघाती हल्लेखोर दुचाकीवरून आला होता. या हल्ल्यानंतर काही पत्रकार वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यावेळी दुसरा हल्लेखोर पत्रकारांजवळ उभा होता. त्याने हा स्फोट घडवून आणला. याबद्दल अद्याप परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही माहिती प्रसिद्ध केली नाही. एएफपीचे वरि× फोटोग्राफ शाह मराई यांचा स्फोटात मृत्यू झाला आहे. हे सगळे पत्रकार रिपोर्टिंगसाठी घटनास्थळी उपस्थित असताना दुसरा स्फोट झाला. सध्या कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.