चालत्या कंटेनरने घेतला पेट
शेवगाव प्रतिनिधी - उष्णता जशी जशी वाढत आहे तसतसे तिचे दुष्परिणाम हळूहळू आता दिसत आहेत, आज शेवगाव मध्ये म्हैसूरहून दिल्लीकडे जाणार्या एम.एच. -20 डी.ई. 7698 या टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी घेऊन जाणार्या कंटेनरने शेवगाव शहरात पेट घेतला, त्याच्यातच आठवडे बाजार असल्याने शेवगाव शहरात एकच खळबळजनक उडाली पण ड्रायव्हर अरुण माळवदे रा. ढोरसडे, ता.शेवगाव यांनी प्रसंगावधान दाखवून हुशारीने कंटेनर शेवगाव शहरातून बाहेर नेवासा रोडला नेवून एका वाशिंग सेंटरवर थांबून पाण्याच्या प्रेशरच्या सहाय्याने कंटेनरला लागलेली आग विझवली, त्यानंतर पाथर्डी नगर परिषदेची अग्निशामक गाडीही तेथे पोहोचली, ड्रायव्हरने दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कंटेनरमध्ये असणार्या टी.व्ही. एस. कंपनीच्या दुचाकी मात्र पूर्णपणे जळून गेल्या होत्या.