Breaking News

शाखा अभियंता दत्तु गीतेंची इडी मार्फत चौकशी करण्याची मागणी लोकमंथनने तोडला माध्यमांमधील भाटांचा अहंकार

भिवंडी/प्रतिनिधी : गेली सोळा वर्ष भिवंडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता आणि तीन वर्ष उपअ भियंता म्हणून आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे दत्तु गिते नामक व्यक्तीमत्वाच्या संपत्तीची इडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी जाणकार नागरिकांसह पंचायत समितीच्या वर्तुळातूनही होऊ लागली आहे.दरम्यान माध्यमे खिशात घालतो अशी शेखी मिरवणार्‍या दत्तु गितेसह त्याच्या माध्यमातील भाटांचा अहंकार लोकमंथनच्या वृत्तमालिकेने तोडला म्हणून लोकमंथनला धन्यवाद दिले जात आहेत.


ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या भिवंडी उपविभागात विकास कामांची दयनीय अवस्था आहे. या अवस्थेला जिल्हा परिषदेतील काही बांडगूळ जेव्हढे जबाबदार आहेत तेव्हढेच माध्यम क्षेत्रात काम करणारे काही दुकानदार कारणीभूत असल्याची भावना लोकमंथनच्या वृत्तमालिके नंतर भिवंंडी पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
भिवंडी पंचायत समिती बांधकाम विभागात शाखा अभियंता या मुळ पदावर कार्यरत असलेले दत्तु गिते यांनी गेली सोळा वर्ष प्रशासनातील काही लतखोरांना हाताशी धरून बदली प्रक्रीयेला फाटा दिला. एकाच ठिकाणी सोळा वर्ष काम करतांना कंत्राटदार, पंचायत समिती आणि जिल्हापरिषदेतील काही अधिकारी आणि तिसरा डोळा म्हणून जबाबदारी पार पाडावी अशी ज्यांच्याक डून समाजाला अपेक्षा आहे त्या माध्यमातील काही दुकानदारांशी निर्माण झालेल्या हितसंबंधांचा या क ाळातील भ्रष्टाचार पचविण्यासाठी वापर केला.
या काळात करोडोंचा भ्रष्टाचार केल्यानंतरही खळगी न भरलेल्या दत्तु गीते यांनी उपअभियंता पदाचा पदभार पात्रता नसतांना गेल्या तीन वर्षापासून स्वतःकडे रहावा म्हणून कुटील डाव खेळले. या खेळात पुन्हा प्रशासन आणि माध्यमातील गीतेंच्या भाटांनी तळमळीने मदत केली. दत्तु गीतेंनी पंचायत समितीच्या रानात घातलेला हैदोस जनतेसमोर यावा म्हणून त्याच्या कृष्णकृत्यांना प्रसिध्दी न देता पाठीशी घालण्याचे पाप केले. तथापी लोकमंथनने या पापाला वाचा फोडली. यातून पंचायत स मितीतील दत्तु गितेंचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर तर आलाच पण माध्यमातील त्याच्या भाटांचाही अहंकार तुटला. लोकमंथनच्या या भुमिकेचे स्थानिक नागरीकांसह पंचायत समितीतील दत्तु गितेंच्या कारभाराने त्रस्त असलेल्या मंडळींनी स्वागत केले आहे.
दरम्यान शाखा अभियंता आणि उपअभियंता म्हणून काम करतांना दत्तु गिते यांनी सोळा वर्षात कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा असून त्यांच्या कार्यकाळातील प्रत्येक कामांची आणि या भ्रष्टाचारातून कमावलेल्या संपत्तीचा पर्दाफाश करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयामार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात. या मागणीचा लोकमंथन पाठपुरावा करून दत्तु गीतेच्या भाटांचाही चेहरा उघड करण्यास कटीबध्द आहे.

*दत्तु गीते...एक शाखा अभियंता तब्बल सोळा वर्ष एकाच ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे गुलछर्ये उधळत आहे. भिवंडी उपविभागात शाखा अभियंता असलेल्या या दत्तुकडे तीन वर्षापासून चक्क उपअ भियंता पदाचा पदभार आहे. महाराष्ट्रात शेती दुष्काळाच्या सावटाखाली आहे असे ऐकले होते, पण बांधकाम विभागातही उपअभियंत्यांचा दुष्काळ पडला आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि ठाणे जिल्हा परिषद प्रशासन दत्तु गितेवर एव्हढे मेहेरबान झाले का?
*तीन वर्षात एकही लायक उपअभियंता मिळाला नाही म्हणून दत्तु गितेला भिवंडी उपविभाग आंदण दिला का? 
*सोळा वर्ष एकाच ठिकाणी सेवा देणारा दत्तु गिते आहे तरी कोण? सोळा वर्षात एकदाही बदलीच्या प्रक्रियेतून दत्तु गिते कसा सुटला? कोण आहेत दत्तु गितेचे पाठीराखे? कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अ धिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनीही दत्तु गितेच्या प्रभावासमोर नांगी का टाकली? विद्यमान मुख्य क ार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून ठाणे जिल्हा परिषदेत रूजू झाले असतांनाही विवेक भिमनवार दत्तु गितेला शरण का जातात?
*नेमकी कुठल्या षडयंत्राची करणी केली दत्तु गितेंने? जिप प्रशासनाचे कुठले इंगीत आहे दत्तु गितेक डे? जिल्हा महसुल प्रशासनाचेही प्रपंच चालविण्याची ताकद असलेला या दत्तु गितेची कुंडली सादर करणारी लेखमाला...