Breaking News

पंतप्रधानांच्या हत्येचा कट; एकास अटक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणार्‍या एकास पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद रफीक असे आहे. रफीक याला याआधी 1998मध्ये कोयंबतूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाने त्याला शिक्षा देखील सुनावली होती. दरम्यान, मोदींच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रफीकला तामिळनाडूतील व्यवसायीक प्रकाश नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर मोदींच्या कटाची चर्चा केल्याचा आरोप आहे. रफीक यांची फोनवर झालेल्या संवादाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.