Breaking News

आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे


शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डीतील शेतक-याची जमिन साई बाबा संस्थानने खरेदी करावी, या मागणीसाठी त्या शेतक-यासमवेत इतरही ग्रामस्थांनी सहभाग घेत टाळ, मृदंगाच्या तालावर ठेका धरत साई संस्थानचा सभागृहाच्या व्दारावर हरीनामाचा गजर भरविला. या ठिय्या आंदोलनाची दखल घेत संस्थानच्या अध्यक्षांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. शिर्डी विविध विकास कार्यकारी सोसायटीपासून बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास या आंदोलानाच्या दिंडीची सुरवात झाली. भजन गात अंदोलकी भक्त संस्थानच्या सभागृहाचे व्दार अडवून हरीनामाचा गजर सुरू करून थांबले. तब्बल दोन तास असा धार्मिक गिताचा आंदोलनीय सपाटा सुरू राहिला. संस्थानचे विश्वस्त माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, अभय शेळके, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, पंकज लोढा, ताराचंद कोते, सचिन चैगुले, दशरथ गव्हाणे, शेतकरी अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, जगन्नाथ गोंदकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.