Breaking News

भाजपशासित राज्ये १० वर्षांपासून मागे का?'


बिहारसह देशांतील अनेक राज्ये पिछाडीवर राहिली आहेत. वास्तविक या राज्यांमध्ये गत दहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. मग बिहारसह सर्व राज्ये पिछाडीवर का, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे. सुमारे १० वर्षांपासून भाजप आघाडी सरकारमध्ये राज्यात सत्तेवर आहे. मग राज्य पिछाडीवर कसे पडले ? ट्विटरवर यादव यांनी हा प्रश्न उपस्थित केला. बिहारमध्ये नितीशकुमार यांचे राज्य आहे. भाजपच दहा वर्षांपासून सरकारमध्ये आहे. बिहार मागास का राहिले ? बिहारची जनता वेळोवेळी कर भरते. राष्ट्रनिर्मितीमध्ये बिहारचाही समान वाटा आहे. बिहारमुळे रालाेआला ३३ खासदार मिळाले आहेत. विद्यमान सरकारमधील सात केंद्रीय मंत्री मूळचे बिहारचे आहेत. केंद्र व राज्यात त्यांची सत्ता असताना बिहार मागास कसा राहिला, असा टोला त्यांनी लगावला.