कठुआ सारख्या घटना घडणे लाजीरवाणे : राष्ट्रपती
नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्षे झाले तरीही देशात कठुआ आत्याचारासारखी घटना घडणे ही बाब अत्यंत लाजीरवाणी असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला विचार कावा लागणार आहे की. आपण कुठल्या प्रकारचा समाज विकसित करीत आहोत. कुठल्याही महिलेवर किंवा मुलीसोबत असे प्रकार घडू नयेत,ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले, या जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे एखाद्या चिमुकलीच्या चेहऱयावरील हास्य, त्यामुळे आपली जबाबदारी आहे की या निष्पापांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन दिलं पाहिजे. मात्र, देशातील अनेक भागात अनेक निष्पाप मुलींना अशा घटनांचा सामना करावा लागतो आहे. ही खूपच लाज आणणारी गोष्ट आहे.