साईसमाधी शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
त्या म्हणाल्या, श्री साईबाबांच्या समाधीस १८ ऑक्टोबर २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. साईबाबा संस्थानच्यावतीने समाधीचा शताब्दी सोहळा दि. ०१ ऑक्टोंबर २०१७ ते दि. १८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त वर्षभर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शनिवारी {दि. १४} नाशिक येथील सुरेंद्र बुरसे यांचा भक्तीसंध्या कार्यक्रम होणार आहे. शनिवारी {दि. २८} नागपूरयेथील धीरज पांडे यांचा हिंदी साईभजन कार्यक्रम आणि त्यानंतरच्या शनिवारी {दि. १२} नाशिकच्या शुभद्रा बाम तांबट यांचा सुगम संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी ७.०० ते रात्रौ ९.३० यावेळेत हनुमान मंदिराशेजारी असलेल्या साईबाबा समाधी मदिर शताब्दी मंडपात होणार आहेत. जास्तीतजास्त ग्रामस्थांनी व साईभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रवाल यांनी केले.