नेप्तीत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे सावतामाळी मंदिरात सावता परिषद, शिवसेना, मनसे व ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सावता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून, सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला.
सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब जाधव तर यावेळी माजी सरपंच दिलीप होळकर, मनसेचे संतोष बेल्हेकर, आंबादास पुंड, बाबासाहेब जाधव, देवा होले, भानुदास फुले, वसंतराव पवार, बाळासाहेब बेल्हेकर, अशोक राऊत, आबा लोंढे, नानासाहेब बेल्हेकर, गौरव होले, दत्ताभाऊ कदम, राजेंद्र होळकर, प्रकाश कांडेकर, सुभाष नेमाणे, विक्रम कदम, विलास जपकर आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या प्रतिमेभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून, त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन कार्यक्रमाचा समारोप झाला.