Breaking News

‘आशेचे द्वार’ प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी : पेरणे

राहुरी प्रतिनिधी - समाजातील वंचित घटकांना मदत करण्याचे, त्यांना आधार देण्याचे ‘आशेचे द्वार’ प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपसरपंच इंद्रभान पेरणे यांनी केले.

राहुरी स्टेशन येथील आदीवासी वस्तीमधील महिलांना ‘आशेचे द्वार’ प्रतिष्ठानच्या माध्यमातून साड्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी पेरणे बोलत होते. ते म्हणाले की, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जोसेफ पवार आणि त्यांचे सर्व सहकारी नेहमीच गरजवंतांना मदत करण्याचे काम करत आहेत. रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, बोअर आदी गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

यावेळी संस्थेचे समन्वयक प्रदीप लोंढे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. भविष्यात गरजवंतांना मदत करण्याचे नवनवीन उपक्रम राबविण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे सदस्य आनंद मखरे, पत्रकार विनित धसाळ यांचे यावेळी भाषण झाले. याप्रसंगी रघुनाथ ठोंबरे, दिपक भालेराव, चंद्रकांत वडागळे, कानिफनाथ धसाळ, बी. के. म्हसे, विठ्ठल म्हसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.