Breaking News

चंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले


कडप्पा : येथील व्होंटिमिट्टा गावात अचानक झालेला जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले आहेत. व्होंटिमिट्टा येथे प्रसिद्ध कोदंदरामा मंदीर आहे. या मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त ’श्रीराम कल्यानम’ (भगवान राम यांचा लग्न समारंभ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चंद्राबाबू नायडू आणि असंख्य भक्त उपस्थित होते. मात्र, याठिकाणी अचानक जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने कार्यक्रमात बाधा आली.