भारिप बहुजन महासंघाचे खर्डा गटप्रमुखपदी सागर आहेर
जामखेड ,तालुक्यातील खर्डा येथील सागर आहेर यांची भारीप बहुजन महासंघाच्या खर्डा गटप्रमुख पदी निवड करण्यात आली. सदरील प्रसंगी डिप्लोमा इंजीनियरींग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक यांनी भारीप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची ध्येय धोरणे आणि आंबेडकरी चळवळीची वाटचाल विषद केली.
भारीप बहुजन महासंघाचे तालुका प्रमुख बापुसाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविकमध्ये भारिप बहुजन महासंघाचे कार्यप्रणाली उपस्थित कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. या बैठकीस सा. पोलीस वॉरटचे संपादक व खर्डा गावचे माजी संरपच बापुसाहेब गायकवाड, प्रा. विकी घायतडक, रणजीत मेंघडबर, भारीप नेते रवी सोनवणे, श्रीकांत कदम, विनोद घायतडक, सोनू सदाफुले, टायगर ग्रुप खर्डा व विभागातून आलेले बहुसंख्य कार्यकर्ते यांनी सागर आहेर यांची एकमताने निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायकवाड यांनी, तर आभार विकी घायतडक यांनी मानले.