महाविद्यालयात अनोखा एप्रिल फूल उपक्रम
लोणी,उन्हाळा येऊन दाखल झाला आहे. तापमानातही परिवर्तन व्हायला सुरुवात झाली आहे. तप्त दुपार आणि गरम हवा पक्ष्यांवर आणि झाडांवर परिणाम करतेच त्यामुळे झाडे लावणे आणि ती वाचवणे, जेणे करून पक्ष्यांना सावली भेटेल म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत महाविद्यालयात अनोखा एप्रिल फूल उपक्रम करण्यात आला.
जलस्त्रोतांचे साठे हे उन्हाळ्यात कमी होत चालले असून त्याचे संवर्धन व झाडे हे जास्त दिवस टिकेल या साठी महाविद्यालयात पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी पालापाचोळ्याचे मल्चिंग करणे, जेणेकरून झाडे जास्त दिवस टिकतील आणि उन्हाळ्यात पक्षासाठी झाडावर पाणी ठेवून पक्ष्यांची तहान भागेल म्हणून प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला आहे.
यावेळी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, रासेयोचे समन्वयक प्रवीण गायकर, प्रा. महेश चेंद्रे, प्रा. अमोल सावंत आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स्वयंसेवक प्रतीक्षा अभंग, मैथिली जाधव, झान्सी पट्टीपाती, चिंता श्रीहर्षा, यश मखर, विनायक चव्हाण, शुभम शिंदे आदींनी परिश्रम घेतले.