पारनेर प्रतिनिधी - येथे दि. 30 मार्च पासुन याञेला सुरुवात झाली .देवीला हळद लावल्यानंतर संपुर्ण निघोज गावातुन मुख्य बाजारपेठेमधुन मिरवणुक काढली जाते. मळगंगा देवीला हळद लावण्यासाठी निघोज, अहमदनगर ,पुणे , मुंबई व महाराष्ट्रातुन हजारो महिला गर्दी करतात. निघोज येथे याञोत्सव काळात नऊ दिवस निघोजमध्ये संपुर्ण शेतीची कामे व मांसाहार पुर्णपणे बंद असतो. हळद लागल्यानंतर याञेला प्रारंभ होतो. यानंतर दुसर्या दिवशी देवीची मानाची काठी मिरवणुकीने उभी करतात. रविवार 8 एप्रिल कालाष्टमीला आंबिल , बगडगाडा मिरवणुक,महाप्रसाद व राञी सर्व मानांच्या काठीची व पालखीची मिरवणुक हा कार्यक्रम पार पडणार आहे. 9 एप्रिल रोजी मळगंगा देवी घागर मिरवणुक ,पालखी मिरवणुक व कुंडमाऊली येथे प्रस्थान.10 एप्रिल रोजी कुंडमाऊली येथे याञोत्सव व कुस्त्यांचा महासंग्राम होत असतो. यानंतर पुन्हा निघोज येथे मुस्लिम व हिंदु समाज एकञ येवुन उरुस ,तमाशा व कुस्त्यांचा महासंग्राम हा कार्यक्रम पार पडतो. मळगंगा देवीची याञा यशस्वीतेसाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट ,ग्रुप ग्रामपंचायत निघोज ,मुंबईकर मंडळी व निघोज ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटना प्रयत्न करत असतात. या याञोत्सवासाठी देश विदेशातुन दहा दिवसाच्या कालावधीमध्ये 7 ते 8 लाख भाविक येतात.यांच्या सुखसुविधेसाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद,कार्याध्यक्ष प्रभाकरराव कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके व सचिव शांताराम कळसकर , सरपंच ठकाराम लंके ,उपसरपंच,सर्व सदस्य , जि.प.सदस्य पुष्पा वराळ व सर्व पञकार बांधव यांच्या उपस्थित 4 एप्रिल रोजी पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे व तहसिलदार भारती सागरे व विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थित याञोत्सव मिटींग पार पडणार .सर्व राजकीय पक्षाचे पदधिकारी व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज मळगंगा याञेला सुरवात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:30
Rating: 5