पारनेर ( प्रतिनिधी ) - अहमदनगर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंर्वधन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा संपन्न होणार असून गुरूवारी दि 5 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदानास प्रारंभ होईल . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा हा आखाडा असणार आहे गोरेगाव कुस्ती परंपरेत जुने असणारे गाव आहे. कुस्तीतील नामांकित पैलवानांच गाव म्हणुन गोरेगावचे नाव प्रचलित आहे. या कुस्त्यांसाठी महाराष्ट्रातील तसेच बाहेरील राज्यातील अनेक नामवंत पैलवानांची हजेरी लागणार असुन आखाडा रंगणार आहे. यामुळे कुस्तीशौकीनांसाठी ही एक खास मेजवानी ठरणार आहे. पारनेर तालुक्याचे आमदार विजय औटी व आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून सभापती राहुलभैय्या झावरे , महानगर बॅक चेरमन उध्दवराव शेळके , पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन प्रशांत गायकवाड शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले , शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले , शिवाजीराव शिर्के, जिल्हपरिषद सदस्य काशिनाथ दाते , आझाद ठुबे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकशेठ कटारिया , उपसभापती दिपक पवार , राहुल शिंदे, मच्छिंद्र लंके , भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे , मा .सभापती मधुकर उचाळे , मा. सभापती गणेश शेळके , ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे ,कुस्ती निवेदक शंकर आण्णा पुजारी , कोल्हापूर प्रसिद्ध हलगीवाले राजू आवळे, कोल्हापूर यावेळी पंच म्हणून पै. डॉ संतोष भुजबळ, पै. गणेश जाधव , पै. मधुकरराव उचाळे , पै .संभाजीराव देठे , पै .चंद्रकांत कावरे , पै. दादाभाऊ नरसाळे , पै. आण्णासाहेब नरसाळे आदि मान्यवर उपस्थित राहणार असुन कुस्तीप्रेमींसाठी हा आखाडा एक नवे पर्व व आपल्या कौशल्याची जाणीव करून देणारा ठरणार आहे. या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक , राजकिय विविध क्षेञातील मान्यवर तसेच पञकार आदि क्षेञातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कुस्तीप्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती रहावे असे आव्हान बाबासाहेब तांबे मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.
गोरेगाव येथे अंबिका याञोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:11
Rating: 5