पारनेर ग्रामीण पतसंस्थेला 2 कोटी एक लाख रुपये ढोबळ नफा
पारनेर ग्रामीण पतसंस्थेला सन 2017 व 18 या आर्थिक वर्षात रुपये 2 कोटी एक लाख ढोबळ नफा झाल्याची माहिती पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक तथा चेअरमन व जि. प. सदस्य काशीनाथ दाते यांनी दिली आहे. संस्थेच्या ठेवी मार्च अखेर 93 कोटी 2 लाख रुपयांच्या आहेत. संस्थेचे खेळते भांडवल 105 कोटी 72 लाख रुपये आहे. वसुल भाग भांडवल 1 कोटी 67 लाख व इतर निधी 8 कोटी 12 लाख रुपये आहे. संस्थेचे कर्ज वाटप 59 कोटी 72 लाख रुपये आहे. गुंतवणुक रुपये 34 कोटी 9 लाख केलेली आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये 575 कोटींची झालेली आहे.
संस्था लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल असे संस्थेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब सोबले यांनी सांगीतले. संस्थेने पंधरा वर्षाच्या कालावधीत पारनेर, जामगांव, टाकळी ढोकेश्वर, कामोठे (नवी मुंबई )खडकवाडी, आळेफाटा, शिरुर, व सुपा येथे स्वमालकिच्या व अद्ययावत इमारती आहेत. पारनेर, टाकळी, अळकुटी, बेलवंडी फाटा, जामगांव, नारायणगव्हाण, आळेफाटा, सुपा, कोमोठे, वनकुटे, अहमदनगर, ढवळपुरी, भोसरी खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी, अशा सोळा शाखा कार्यरत आहेत. तसेच शिरुर येथे अक्षय मुहर्तावर 17 वी
शाखा सुरु करण्यात येणार आहे.
संस्थेचे कार्यक्षेञ अहमदनगर, पुणे, ठाणे व मुंबई आहे. संस्थेमार्फत पारनेर, टाकळी, अळकुटी, जामगांव, बेलवंडी फाटा, ढवळपुरी येथे सभासदांना लॉकर सुविधा देण्यात आली आहे. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये अधिकृत वीज भरणा केन्द्र, आर. टी. जी. एस. व एन. ई. एफ. टी सुविधा सुरु करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी
सांगितले.