Breaking News

मंत्री जानकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्याचा निर्धार

राहुरी प्रतिनिधी - राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तसेच दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नवीन पदाधिकारी निवडीनिमित्त दि. ७ रोजी जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. जानकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

याप्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य नितिन धायगुडे, राज्य सरचिटणीस अण्णासाहेब रुपनर, प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बाचकर, जिल्हा संघटक रंगनाथ पारखे, युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब जूंधारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुवर्णा जर्हाड, जिल्हा उपाध्यक्षा अलका पवार, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र डोमाळे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या बळकटीसाठी व पक्षाच्या वृद्धीसाठी विविध पदाधिकार्यांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरु करावे, असे मनोगत अनेक पदाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केले. दि. १९ रोजी राज्याचे कॅबिनेटमंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबविणार असल्याचे शरद बाचकर यांनी सांगितले. यावेळी युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब शिंदे, महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी रेखा नरवडे, मंगेश झिने आदींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. नूतन पदाधिकाऱ्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. महिला आघाडी तालुकाध्यक्षा माया पठारे यांची महिला आघाडी जिल्हा सह सचिवपदी पदोन्नती करण्यात आली.