Breaking News

कॅल्शियम तपासणी शिबिर कौतुकास्पद उपक्रम : गर्जे बालाजी हॉस्पिटलचा वर्धापदिन उत्साहात

खाण्याच्या बदलत्या आहार शैलीमुळे अनेक लोकांच्या हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता भासत आहे. गरीब रुग्णांच्या हाडातील कॅल्शियम तपासणी व त्यावरील औषधोपचारासाठी बालाजी एक्सिडेंट हॉस्पिटल आणि डॉ. गणेश सारूक यांनी सामाजिक बांधिलकीतून राबवलेले कॅल्शियमची तपासणी शिबिर कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी केले. 

शहरातील बालाजी हॉस्पिटलच्या वर्धापदिनानिमित्त कॅल्शियमची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन तहसिलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील गोरगरीब रुग्णांची मोफत अस्थिरोग निदान व हाडातील कॅल्शियमची तपासणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी स्पाइन सर्जन डॉ. मंदार भोसले, उत्तम गर्जे, भगवान बांगर, पोपट ढाकणे, धर्मराज शिरसाठ, अशोक मंत्री, सागर सारुक, मीना सारुक, सलाम पठाण, अड. सारुख आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या शिबिरात तालुक्यातील ३४० रुग्णांनी कॅल्शियमची मोफत तपासणी करून घेतली. हाडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या १३० रुग्णांची तपासणी डॉ. मंदार भोसले व गणेश सारुक यांनी रुग्णांना आवश्यक ते उपचार करण्यासंबधी मार्गदर्शन केले.