शेवगाव बसस्थानकात घाणीचे साम्राज्य
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या शेवगाव बसस्थानकाला स्वच्छतेचे वावडे आहे की काय असे प्रवासी बोलताहेत. शेवगाव बस स्थानकामधून दररोज शेकडो बसेसची ये-जा होत असून शेवगाव बस स्थानकामध्ये प्रत्येक कोपर्यामध्ये घाणीचे साम्राज्य असलेले दिसते तसेच नवीन बांधलेल्या सातही गाळ्यांमध्ये प्रत्येक भिंती रंगविलेल्या दिसतात. बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग , पाण्याच्या बाटल्या, खाऊची पाकिटे व कचरा ठिकठिकाणी पडलेले आढळतात तर ग्रामीण भागासाठी असलेल्या तीनही गाळ्यामध्ये प्रचंड घाण असून त्या ठिकाणी तर उभा राहिला ही नकोसे वाटते कारण त्या ठिकाणी प्रचंड घाण असल्या मुळे येणारा उग्र वास कचरा आणि याच कारणाने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत असून बस स्थानक प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत असेल तर ही फार मोठी दुर्दैवी बाब म्हणावी लागेल एकीकडे शासन स्वच्छता अभियानाच्या नावाने भरमसाठ खर्च क रत असताना शेवगाव आगाराला याच्याशी काहीच देणेघेणे नाही का असा सवाल प्रवासी विचारत आहेत तर पिण्यासाठी पाणपोई आहे परंतु त्यात कधी पाणी असते तर कधी नसते आणि त्याचमुळे प्रवाशांना विकत पाणी घेऊन पाणी प्यावे लागते तर पाण्याच्या टाकी जवळच माणुसकीची भिंत उभारली असून या भिंती शेजारीच प्रवासी लघुशंका करत असल्यामुळे या ठिकाणीदेखील घाण वास येतो त्यामुळे आगार प्रमुखांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी करत आहेत.