Breaking News

‘निळवंडे’साठी १५८ कोटींची तरतूद : विखे

लोणी प्रतिनिधी - जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात १५८ कोटी ८३ लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिली. निळवंडे धरणासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे त्यांनी केली होती. याबाबत जलसंपदा व अर्थ मंत्र्यांकडे त्यांचा व्यक्तिगत पाठपुरावा सुरू होता. 

असे सांगून विखे पाटील म्हणाले की, यापुर्वी देखील पुरवणी मागण्याच्या माध्यमातून ७० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद पाठपुराव्या मुळे सरकारला करावी लागली होती. याव्यतिरिक्त नाबार्ड कडूनही ४६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याने या अर्थिक वर्षात एकूण २७० कोटी ८३ लाख रुपयांचा निधी निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.