दुधोडीच्या सरपंचपदी मनोहर शिर्के
संगिता राजेंद्र गोळे व उपसरपंच आण्णासाहेब परकाळे यांनी आपला अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाची पुन्हा निवडणुक झाली. त्यामध्ये ही बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच व उपसरपंच या पदासाठी दोनच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली. डी एम. डहाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी राजेंद्र गोळे, बाळासाहेब परकाळे, बाळासाहेब कोराळे, सचिन शिर्के, राजेंद्र जांभळे, बळीराम जांभळे, शिवाजी जांभळे, रामराव भोसले, सुधीर परकाळे, ग्रामसेवक बाळासाहेब शेटे, कोतवाल भाऊ शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.